'पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही' | जितेंद्र आव्हाड

2022-01-09 38

ओबीसी वर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावरही आज त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "वक्तव्य बदलणारा माणूस मी नाही. मी जे बोलतो ते माझ्या हृदयापासून असते. पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही. मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम आहे." पुढे त्यांना निर्बंधांवर विचारलं असता ते म्हणाले, "मला निर्बंधाच्या बाबतीत जास्त काही माहिती नाही, काल रात्री हे निर्बंध जाहीर केले असं काहीतरी समजतंय. मी सकाळपासून माझ्या कामात होतो. आज रात्रीपासून निर्बंध लागणार आहेत असं कळतंय, असं वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Videos similaires